भुसावळात अवैध वाहतूक करणार्या वाहनांचा १४ रोजी लिलाव
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ डिसेंबर २०२१ । भुसावळात महसूल प्रशासनाने जप्त केलेल्या चार वाहनांचा महसूल विभागातर्फे १४ रोजी लिलाव केला जाणार असल्याची माहिती तहसीलदार दीपक धीवरे यांनी दिली.
अवैधरीत्या गौण खनिजची वाहतूक करीत असतांना महसूल विभागातर्फे पकडण्यात आलेल्या ट्रक धारकांना दंड भरण्याच्या नोटिसा महसूल विभागातर्फे देण्यात आल्या मात्र गाडी मालकांनी दंडाची रक्कम न भरल्याने महसूल विभागातर्फे दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी गाड्यांचा लिलाव होत आहे. महसूल विभागातर्फे १४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयाच्या आवारात लिलाव होईल. गाड्यांच्या लिलावासाठी उपप्रादेशीक परीवहन अधिकारी यांच्याकडून मुल्यांकन करण्यात आले आहे. त्या मूल्यांकनास प्रांताधिकारी यांनी मंजूरी दिली आहे. ट्रक (एम.एच.19 जे.9666), ट्रक (एम.एच.26 बी.4789), ट्रक (एम.एच.19 झेड.0075), ट्रक (एम.एच. 15 ए.जी.7860) या गाड्यांचा लिलाव होत असून प्रत्येक गाडी चालकाकडे दोन लाख 62 हजार 22 रुपयांची थकबाकी आहे.