जळगाव लाईव्ह न्यूज । १० डिसेंबर २०२१ । महिला सुरक्षा संघटनेच्या अमळनेर तालुकाध्यक्षपदी सुलोचना वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती महिला सुरक्षा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष किसन काशीद पाटील यांनी एका पत्रकाद्वारे केली.
सुलोचना वाघ ह्या जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा असून जिल्ह्यात महिलांविषयक मोठ्या प्रमाणात त्यांनी व्यापक जनजागृती केली आहे. त्यामुळे त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे मित्र परिवार आणि संघटना व महिला मंडळांनी गौरव केला आहे.दरम्यान,महिलांविषयक कार्य पाहता तसेच महिलांवरील अन्याय,अत्याचार,लैंगिक शिक्षण,आणि कौटुंबिक हिंसाचार अशा अनेक समस्यांचे योग्य निवारण करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य कराल. तसेच संस्थेच्या ठरवून दिलेल्या ध्येय धोरणाच्या आधारे आपण संघटना वाढीसाठी मदत कराल, अशी अपेक्षा नियुक्ती पत्राद्वारे किसन पाटील यांनी व्यक्त केली असून, या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र काैतुक केले जात आहे.