चाळीसगावात अल्पवयीन विद्यार्थ्याची आत्महत्या

डिसेंबर 9, 2021 12:07 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ डिसेंबर २०२१ । चाळीसगाव येथे एका अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना  ८ रोजी घडली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

crime

सविस्तर असे की, चाळीसगाव शहरातील हरगीरबाबा नगर येथील लक्ष्मण संजय पवार (वय-१६) या अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची थरारक घटना ८ रोजी  २:३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. व पंचणामा करण्यात आले आहे. दरम्यान मयताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि दिपक बिरारी हे करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now