किनगांव येथे १६ वर्षीय तरुणीचा विनयभंग : तरुणावर गुन्हा दाखल

डिसेंबर 8, 2021 12:19 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । किनगाव खु. ( ता. यावल ) येथे एका १६ वर्षीय अल्पवयीन तरुणीचा विनयभंग केल्याची घटना ७  रोजी घडली. या प्रकरणी तरुणीच्या फिर्यादीयावरून येथील पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

सविस्तर असे की, तरुणी आपल्या आई, वडिल व आजीसह किनगाव येथे भाजीपाला विक्रिचा व्यवसाय करतात. दरम्यान, ७ रोजी सांयकाळी ५ ते ६ वाजेच्या दरम्यान, येथील बाजारात तरुणी भाजीपाला विक्रि करित असतांना किनगावातील ओळख असलेला आरोपी राहुल बाळू पवार रा. किनगाव खु. ( वय माहित नाही )  हा फिर्यादी तरुणीला पाहून जवळ आला व तुझा मोबाइल नंबर दे व माझा नंबर घे तसेच तरूणीला लज्जापद होईल असे उद्देशाने असा बोल्यावर तरुणींने लगेच आपल्या आईला सांगितले असता आरोपी तिथुन लागलीच पळून गेला. या प्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून यावल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास उपनिरिक्षक जितेंद्र खैरनार हे करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now