यावल तालुका दक्षता समितीच्या अध्यक्षपदी आ. शिरीष चौधरी यांची निवड

डिसेंबर 7, 2021 1:29 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांची तालुका दक्षता समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी महाराष्ट्र राज्य शासनाच्या निर्णयानुसार तालुका पातळीवरील दक्षता समितीच्या नियुक्त्या जाहीर केल्या.

Yawal jpg webp

समितीच्या पदसिद्ध उपाध्यक्षपदी यावलच्या नगराध्यक्ष नौशाद मुबारक तडवी यांची तर सदस्य म्हणुन यावल पंचायत समितीच्या सभापती पल्लवी पुरूजीत चौधरी, गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड, अशासकीय सदस्यपदी संगीता नितिन चौधरी, महिला सदस्यपदी सविता अरूण लोखंडे, अशासकीय महीला सदस्यपदी मंजुषा सांळुके, विरोधी पक्षाचे सदस्य महेन्द्र भागवत चौधरी, विरोधी पक्षाच्या महीला सदस्य वैशाली राजेन्द्र चौधरी, रास्त भाव दुकानदारांचे प्रतिनिधी सदस्य यशवंत गोविंदा जासुद, अनुसुचित जमाती प्रतिनिधी पं.स.चे सदस्य सरफराज सिकंदर तडवी, अनुसुचित जाती प्रतिनिधी चंद्रकला इंगळे, डोंगर कठोरा येथील सामाजीक कार्यकर्ता भोजराज तुकाराम पाटील, सदस्य सचिवपदी तहसीलदार महेश पवार आदींची निवड करण्यात आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now