काकनबर्डीची खंडेराव महाराज यात्रा रद्द

डिसेंबर 6, 2021 3:31 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ डिसेंबर २०२१ । कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव तसेच नवीन ओमायक्रॉन आजाराचा प्रादुर्भाव लक्षात घेत, काकनबर्डी (ओझर) ता.पाचोरा येथील खंडेराव महाराज यंदाचा यात्रा उत्वस रद्द करण्यात आला आहे. असे आवाहन यात्रा कमिटी, पोलीस प्रशासन, महसुल प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.

yatra raddh jpg webp

सविस्तर असे की, काकनबर्डी (ओझर) ता.पाचोरा येथे चंपाशष्ठीला खंडेराव महाराज यात्रा भरत असते यावर्षी दि. 09/12/2021 रोजी यात्रा उत्सव होता. व सदर यात्रे करीता परीसरातून तसेच तालुक्यातुन मोठ्या प्रमाणात लोक येत असतात. परंतु, यंदा जगभरात तसेच महाराष्ट्रात देखील कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आहे. तसेच नवीन ओमायक्रॉन आजाराचा प्रादुर्भाव असल्याने यंदाचा यात्रा उत्वस हा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे कोणीही यात्रे करीता येऊ नये, कोणीही दुकाने लावु नये तसेच कोणीही गर्दी करु नये, असे यात्रा कमिटी, पोलीस प्रशासन, महसुल प्रशासनाद्वारे आवाहन करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now