शिरसोली येथे एकाची गळफासाने आत्महत्या

डिसेंबर 6, 2021 11:54 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ डिसेंबर २०२१ ।  शिरसोली येथे एका प्रौढ व्यक्तीने नैराश्याच्या मनस्थितीत राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ५ रोजी घडली. याप्रकरणी एम.आय.डी.सी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

crime jpg webp
सविस्तर असे की, शिरसोली प्र.ब.येथील रहिवाशी रघुनाथ रामदास अस्वार ( वय ४२ ) यांनी काल दुपारी सव्वा चार वाजेच्या सुमारास घरातील छताच्या हुकाला पांढऱ्या रुमालाने गळफास घेऊन आत्महत्या केली. शिरसोली प्र.बो.चे पोलीस पाटील शरद पाटील आणि शिरसोली प्र.न.चे पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी त्यांना खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले आणि पोलिसांना माहिती दिली . शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात सीएमओ डॉ.अजय सोनवणे यांनी त्यांना मृत घोषित केले. एम.आय.डी.सी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, १ मुलगा, १ मुलगी, २ भाऊ असा परिवार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now