जळगाव जिल्हा

यंदा कमळगाव काळभैरव यात्रा भरणार; असे असतील नियम

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ डिसेंबर २०२१ । कमळगाव येथील चांदसनी काळभैरव यात्रा गेल्या एक वर्षांपासून स्थगित झाली होती. ती यंदा भरत असल्याचे आढावा बैठकीत निर्णय घेण्यात आला. दरम्यान, कोरोनाचे सर्व नियम पाळून भक्तांनी यात्रेसाठी असे आवाहन केले.

यावेळी आढावा बैठकीचे अध्यक्ष तहसीलदार अनिल गावित, अडावद पोलीस स्टेशनचे एपीआय किरण दांडगे, MSCBE चे अधिकारी चौधरी, आरोग्य अधिकारी डॉ. लासुरकर, कालभैरव संस्थेचे अध्यक्ष दिलीप बाविस्कर, उपाध्यक्ष सुरेश आप्पा पाटील, सचिव शालीग्राम, तुळशीराम पाटील, तसेच चांदसनी आणि कमळगाव गावाचे सरपंच, उपसरपंच आणि चांदसनी गावचे पोलीस पाटील व तंटामुक्ती अध्यक्ष उपस्थित होते,

दरम्यान, बैठकीत कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे नियम पाळून सर्व भाविकभक्तांना यात्रेसाठी येतांना लस आणि मास्क बंधनकारक असेल तसेच कोरोनाचे सर्व नियम पाळून काळभैरव यात्रा उत्सव करण्याचे ठरले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button