जागा हडप केल्याप्रकरणी बाबा महाहंस महाराजला पोलिस कोठडी

डिसेंबर 4, 2021 5:33 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ डिसेंबर २०२१ । यावल तालुक्यातील सातपुडा निवासीनी मनुदेवी सेवा प्रतिष्ठानच्या जागा नसल्याचे भासवून बनावट संस्था आणि कागदपत्र तयार करून जागा हडप केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात बाबा महाहंस महाराज याला पोलिसांनी अटक केली आहे.  दरम्यान, आज संशयित बाबा महाहंस महाराज यास आज येथील न्यायालयात हजर केले असता ४ दिवसीय पोलिस कोठडी सुनावली आहे.

Baba Mahahans Maharaj arrested case of land

सातपुडा निवासीनी मनुदेवी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शांताराम राजाराम पाटील (वय-६२) रा. आडगाव ता. यावल यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, प्रकाश मार्तंड पाटील उर्फ श्री बाबा महाहंस जी महाराज रा. आडगाव ता. यावल यांनी सातपुडा निवासीनी श्री मुनदेवी मंदीर सेवा प्रतिष्ठान ही जागा वनविभाग कक्ष नं. १४९ गट नं. ३५३ मध्ये ०.२४ आर ही जागा ही वनविभागात येते. परंतू बाबा महाहंस यांना जागा वनविभागाची असल्याचे माहिती असतांना बनावट दस्तऐवज तयार केले आणि ही जागा मंदीराची नसल्याचे दाखवून त्या ठिकाणी नवीन मुनदेवी चॅरिटेबल ट्रस्ट या नावाने नव्याने संस्था स्थापन करून फसवणूक केली. यासंदर्भात यावल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.त्यांच्या तक्रार आणि न्यायालयाच्या आदेशान्वये संशयित बाबा महाहंस महाराज यांच्यावर यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती.

दरम्यान, संशयित बाबा महाहंस महाराजला न्यायालयात हजर केले असता त्यांना ४ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायमूर्ती एम.एस.बनचरे यांनी हा आदेश दिला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now