मंत्री ना. छगन भुजबळ उद्या जळगाव जिल्हा दौरा, असा असेल दौरा?
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ नोव्हेंबर २०२१ । उद्या सोमवारी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ जळगाव जिल्हा दौरा येत आहे. ते पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मुलाच्या लग्नाला पाळधी येथे उपस्थिती देणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे कनिष्ठ चिरंजीव विक्रम व चि.सौ. कां. प्रेरणा यांच्या शुभविवाह सोमवारी २९ नोव्हेंबर रोजी पाळधी येथील साईबाबा मंदीर परिसरात आयोजित करण्यात आले आहे. या लग्नाच्या सोहळ्याला । राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांची उपस्थिती राहणार आहे.
सोमवारी सायंकाळी ५.४५ वाजता जळगावात आगमन, ६.१० वाजता एमआयडीसीतील हॉटेल प्रसिडेंट येथे आगमन व राखीव राहणार आहे. सायंकाळी ७ वाजता लग्नाच्या कार्यक्रमाला उपस्थिती, ८.१५ वाजता पाळधी येथील जैन इरिगेशन कंपनीला भेट व स्नेहभोजन करतील, त्यानंतर ९ वाजता जळगाव विमानतळाव आगमन त्यानंतर रात्री ९.३० वाजता जळगावहून मुंबईकडे विमानाने प्रस्तान करणार आहे. अशी माहिती जिल्हा महिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.