गुन्हेजळगाव शहर

के.सी.पार्क जवळ भीषण अपघात, ट्रॅक्टरच्या धडकेत दोघे ठार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ नोव्हेंबर २०२१ । शहरातील अपघातांची मालिका पुन्हा सुरू झाली असून गुरुवारी पहाटेच्या सुमारास के.सी.पार्कजवळ भीषण अपघात झाला आहे. ट्रॅक्टरच्या धडकेत चारचाकीतील दोघे जागीच ठार झाले. अपघातात एक महिला व एक पुरुष जखमी झाले असून दोघांना तात्काळ उपचारार्थ रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

शहरात अपघातात दररोज कुणाचा तरी बळी जात आहे. बुधवारी डंपरच्या धडकेत एका अधिपरिचरिकेला आपला जीव गमवावा लागला होता. गुरुवारी पहाटेच्या सुमारास भादली येथील पाटील कुटुंबीय नातेवाईकाला भेटण्यासाठी भोकर येथे चारचाकी क्रमांक MH.14.FC.4550 ने जात होते. चालक बंडू पाटील हे होते.

कानळदा रस्त्यावरील के.सी.पार्क जकात नाक्याजवळ समोरून भरधाव वेगात येत असलेल्या लाकडाने भरलेल्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. अपघातात चारचाकीचा पुढील भाग चक्काचूर झाला असून चालकासह एक महिला जागीच ठार झाली आहे. तसेच एक महिला व एक पुरुष दोघे जखमी झाले असून त्यांना लागलीच उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली असून त्यांनीच जखमींना बाहेर काढले. याप्रकरणी अद्याप पोलिसात कोणतीही नोंद करण्यात आली नाही.

Related Articles

Back to top button