युवासेनेतर्फे २२ रोजी अन्नदान व रक्तदान शिबिराचे आयोजन
जळगाव लाईव्ह न्यूज । २१ नोव्हेंबर २०२१ । शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजीमंत्री सुरेशदादा जैन यांच्या ७८ व्या वाढदिवसानिमित्त युवासेनेतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील दाणा बाजार, रेल्वे स्थानक, शिवाजी नगर व रेल्वे माल धक्का येथे २,१०० गरजू लोकांना खिचडी व शिरा वाटप करण्यात येणार आहे तर काव्यरत्नावली चौकात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
युवासेनेतर्फे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजीमंत्री सुरेश जैन यांच्या ७८ व्या वाढदिवसानिमित्त सोमवार दि.२२ रोजी सकाळी १०.३० वाजता शहरातील दाणा बाजार, रेल्वे स्थानक, शिवाजी नगर व रेल्वे माल धक्का आदी ठिकाणी गरजू लोकांना खिचडी व शिरा वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता काव्यरत्नावली चौक येथे रक्तदान व रक्तगट तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन युवासेना सहसचिव विराज कावडीया, महानगर युवाधिकारी स्वप्नील परदेशी, विशाल वाणी यांनी केले आहे.