एलसीबीने पुन्हा पकडले गावठी पिस्तूल
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२१ । एलसीबी तसेच पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाने भुसावळात गावठी पिस्तूल पकडल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारीदेखील एलसीबीने भुसावळातच चितोळे मंगल कार्यालय परिसरात खुशाल ऊर्फ बंटी गजानन बोरसे ( वय २५, रा. खडका रोड, भुसावळ ) याला गावठी पिस्तूलसह पकडले. असून, एकाच आठवड्यात भुसावळात तिसरे पिस्तूल पकडण्यात आले आहे.
खुशाल याच्याकडे गावठी पिस्तूल असून, तो चितोळे मंगल कार्यालय परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलीस पथक रवाना झाले होते. ठरल्या जागीच खुशाल पिस्तूलसह मिळून आला. त्याला अटक करण्यात आली आहे.
या पथकांनी पकडले
पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी सहायक निरीक्षक जालिंदर पळे, सहायक फौजदार अशोक महाजन, लक्ष्मण पाटील, संदीप सावळे, किशोर राठोड, रणजित जाधव, श्रीकृष्ण देशमुख, विनोद पाटील, ईश्वर पाटील व विजय चौधरी यांचे पथक रवाना केले होते.