जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मे २०२२ । गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात व रुग्णालयातील स्त्रीरोग विभागात कार्यरत रेसिडेंट डॉ.यशश्री देशमुख यांनी राज्यस्तरीय ओबीजीवायएनकॉन राज्यस्तरीय परिषदेत पेपर सादर करुन प्रथम तर डॉ.आफिया खान यांनी भित्तीपत्रक सादरीकरणातून तृतीय क्रमांक पटकाविला.
द असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ऑब्स्ट्रेट्रिक्स अॅण्ड गायनॅकलॉजिकल सोसायटीज (रोसी) च्या मार्गदर्शनानुसार औरंगाबाद ओबीजीवाय सोसायटीतर्फे शनिवार, ७ मे रोजी ओबीजीवाराज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यात सहभागींनी पेपर व पोस्टर्स सादरीकरणात सहभाग नोंदविला. यात डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ओबीजीवाय शाखेत एम.एस.द्वितीय वर्षाला असलेल्या डॉ.यशश्री देशमुख यांनी सहभाग नोंदवून प्रथम क्रमाकं पटकाविला. तसेच एम.एस.प्रथम वर्षाला प्रवेशित डॉ.आफिया खान यांनी भित्तीपत्रक सादरीकरणात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यात तृतीय क्रमांक डॉ.आफियाने प्राप्त केला. त्याबद्दल औरंगाबाद जीएमसीचे फॅक्ल्टी असलेल्या तज्ञांच्याहस्ते बक्षीस देऊन गौरव केला. बक्षीसाचे स्वरुप रोख रक्कम व प्रमाणपत्र असे होते.
याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील यांनी डॉ.यशश्री व डॉ.आफिया यांचे कौतुक करीत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. तसेच डीन डॉ.एन.एस.आर्विकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, ओबीजीवाय प्रमुख डॉ.माया आर्विकर आदिंनी कौतुक केले.
या स्पर्धेत डॉ.यशश्री देशमुख यांनी गरोदरपणात स्त्रीयांच्या वाढणार्या बीपीबाबत सुरुवातीपासूनच कलर डॉपलरद्वारे कसे ओळखले जाऊ शकते, या विषयावर पेपर सादर केला. तर डॉ.आफिया खान यांनी स्त्रीयांना गरोदरपणात जर इन्फेक्शन झाले तर ते कसे ओळखले जाऊ शकते, याबाबत भित्तीपत्रक सादर केले.