‘रब्बी पूर्व हंगामी हरभरा व कांदा उत्पादन’ तंत्रज्ञानावर कार्यशाळेचे आयोजन
जळगाव लाईव्ह न्यूज । १६ नोव्हेंबर २०२१ । कृषी विभाग, जळगाव आणि कृषि विज्ञान केंद्र, ममुराबाद व पाल यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि.१७ रोजी ‘रब्बी पूर्व हंगामी हरभरा व कांदा उत्पादन तंत्रज्ञान’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन नियोजन भवन येथे करण्यात आले आहे. कार्याशाळेत हरभरा, कांदा व गहू पिकाचे उत्पादन तंत्रज्ञान, बीबीएफ यंत्राव्दारे हरभरा लागवड, किडरोग एकात्मिक व्यवस्थापन, बियाणे उत्पादन कार्यक्रम व प्रमाणिकरण व इतर अनुषंगिक घटकांबाबत माहिती देण्यात येणार आहे.
कार्यशाळेत हरभरा व कांदा पिकांबाबत महात्मा फुले कृषि विद्यापिठाचे डॉ.एन.एस. कुटे, प्रगतीशील शेतकरी डॉ.दत्तात्रय वने, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा कार्यक्रम समन्वयक डॉ. हेमंत बाहेती, विषय विशेषज्ञ वैभव शिंदे, विभागीय बीज प्रमाणिकरण अधिकारी हितेंद्र सोनवणे तर गहु पिकाबाबत विषय विशेषज्ञ प्रा.अतुल पाटील व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर आदी मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यशाळेचे ऑनलाईन प्रसारण
यु-टयुब चॅनलवरील https://youtu.be/tLv६JcUeL८s या लिंकव्दारा ऑनलाईन पद्धतीने सकाळी १० वाजता या कार्यशाळेचे प्रसारण करण्यात येणार आहे. जिल्हयातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर व कृषि उपसंचालक अनिल भोकरे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.