जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन

नोव्हेंबर 15, 2021 6:42 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ नोव्हेंबर २०२१ । जळगाव जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये १६ नोव्हेंबर रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामसभेत सध्या अस्तित्वात असलेली मतदार यादी गावातील सर्व ग्रामस्थांना पाहण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व मतदारांनी विशेष ग्रामसभेत सहभागी व्हावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी केले आहे.

Voter List 1 jpg webp

भारत निवडणूक आयोगाकडून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीची पडताळणी व दुरुस्ती तसेच १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकानुसार नव मतदारांची नाव नोंदणी करुन मतदार यादी सुधारीत करण्यात येत आहे. त्यासाठी १६ नोव्हेंबर रोजी जळगाव जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या ग्रामसभेत सध्या अस्तित्वात असलेली मतदार यादी गावातील सर्व ग्रामस्थांना पाहण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

ज्यांचे वय १ जानेवारी २०२२ रोजी १८ वर्षे पूर्ण होत आहे. तसेच ज्यांची नावे अद्याप मतदार यादीत नोंदविलेली नाहीत त्यांची मतदार म्हणून नोंदणी करण्यात येईल. गावातील सर्व ग्रामस्थांना मतदार यादीमधील नोंदी तपासून दावे व हरकती घेता येतील. तसेच गावातील मयत, स्थलांतरीत, दुबार मतदारांची नावे वगळण्यात येणार आहेत. दिव्यांग तसेच अतिमहत्वाच्या व्यक्तींची नावे मतदार यादीमध्ये चिन्हांकीत करण्यात येणार आहेत. ग्रामपंचायत हद्दीतील सर्व मतदारांनी विशेष ग्रामसभेत सहभागी व्हावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now