गुलाबराव देवकरांच्या शिक्षेवरील स्थगितीच्या याचिकेवर १८ रोजी सुनावणी
जळगाव लाईव्ह न्यूज । १५ नोव्हेंबर २०२१ । माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या घरकुल प्रकरणातील शिक्षेवरील स्थगिती उठविण्याबाबत दाखल याचिकेवर आज (दि.१५) रोजी कामकाज झाले. यावेळी सुप्रीम कोर्टाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतली. पुढील सुनावणी १८ नोव्हेंबरला होणार आहे.
माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या शिक्षेवरील स्थगिती उठविण्याबाबत सामाजिक कार्यकर्ते पवन ठाकूर यांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सोमवार दि.१५ रोजी निर्णय होणार होता. परंतू आज न्यायालयाने दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकून घेतल्या. त्यानंतर माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या वकिलांनी एका आठवड्यानंतर सुनवाई घेण्याची विनंती केली. त्यावर याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी २१ तारखेला मतदान असल्याचे सांगत लवकर सुनवाई घेण्याची विनंती केली. त्यावर न्यायालयाने पुढील सुनावणी १८ नोव्हेंबरला ठेवली आहे.