सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रमात शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन

नोव्हेंबर 13, 2021 3:33 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२१। राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात झालेला सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे सोयाबीन बीजोत्पादन क्षेत्र मोठया प्रमाणात बाधीत झाले आहे. त्यामुळे खरीप हंगाम २०२२ करीता सोयाबीन प्रमाणीत बियाण्याची गरज विचारात घेउन शासनाचे निर्देशनानुसार महाबीजव्दारे उन्हाळी रब्बी हंगामात राबविण्यात येत असलेल्या तृटीपुर्ती सोयाबीन बिजोत्पादन कार्यक्रमात जिल्ह्यातील शेतकरी बांधवानी सहभागी व्हावे, असे आवाहन महाबीजव्दारे करण्यात आले आहे.

Soyabin jpg webp

जळगाव जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील शेतकरी बांधवानी सोयाबीन बिजोत्पादन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा. उत्पादीत सोयाबीन वाणाच्या बियाण्यासाठी आकर्षक खरेदी धोरण ठरविण्यात आले असून सोयाबीन उत्पादनासाठी एका गावात कमीत कमी २५ एकर क्षेत्राचे नियोजन होणे आवश्यक आहे. त्यासाठी लागणारे शुल्क बियाणे उचल करतांना भरावयाचे आहे, याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी.

ज्या शेतकरी बांधवाना महाबीजच्या सोयाबीन बिजोत्पादन कार्यक्रम घ्यावयाचा आहे. त्यांनी महाबीजच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधुन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now