जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२१ । शहरातील गोलाणी मार्केटच्या प्रसाधनगृहात एका विक्रेत्याने खाद्यपदार्थांचे सामान ठेवल्याचा व्हिडीओ जळगाव लाईव्हने प्रसिद्ध केला होता. जळगाव लाईव्ह न्यूजच्या वृत्ताची दखल घेत गुरुवारी महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी गोलाणीत जाऊन पाहणी केली. पाहणी दौऱ्यात बहुतांश प्रसाधनगृह बंद असल्याचे आढळून आले.
गोलानी मार्केटमधील प्रसाधनगृहे अनेकांनी बळकावली असून स्वतःचे कुलूप लावले आहे. बुधवारी जळगाव लाईव्ह न्यूजने याबाबत एक वृत्त प्रसारित केले होते. वृत्ताची दखल घेत महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी लागलीच मार्केटची पाहणी केली. गोलाणी मार्केटमधील बहुतांश प्रसाधन गृह बंद असल्याचे त्यांना आढळून आले. मनपा अधिकाऱ्यांना सूचना देत तात्काळ सर्व अतिक्रमण काढण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या आहेत.
पहा व्हायरल व्हिडीओ :
https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/279675296901409