जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२१ । सावदा येथील लखन ट्रेडर्स स्टेटस वर अन्न व औषध प्रशासन विभागाने मोठी कारवाई केली असून तीन लाख 67 हजाराचा गुटखा जप्त केला आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
काल सकाळी अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकारी आर.एन. भरकड व के.ये.साळुंखे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून त्यांनी ही कारवाई केली आहे. या कार्यवाही मुळे येथे अवैधगुटखा विक्री करणा-या मध्ये एकच खळबळ उडाली असून दरम्यान रात्री उशिरा पर्यंत सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
याप्रकरणी एका जणांवर गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक करण्यात आली आहे. तर सवदा पोलिसांन समोर येथे एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री सुरू असतांना त्यांना याची खबर नाही का? असा प्रश्न देखील यानिमित्ताने निर्माण झाला असून सावदा पोलिसांचे कार्यक्षमतेवर यामुळे प्रश्न चिन्ह निर्माण होत असून यापुढे तरी अश्या प्रकारे अवैध गुटखा विक्री थांबावी अशी अपेक्षा व्यक्त होत असताना अन्न भेसळ विभागाने देखील कार्यवाहीत सातत्य ठेवणे देखील अपेक्षित आहे.