⁠ 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | रावेर | कष्टकऱ्यांच्या सन्मानार्थ ‘बळीराजा गौरव दिन’ घराघरात साजरा व्हावा : सोपान पाटील

कष्टकऱ्यांच्या सन्मानार्थ ‘बळीराजा गौरव दिन’ घराघरात साजरा व्हावा : सोपान पाटील

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ नोव्हेंबर २०२१ । कष्टकऱ्यांच्या सन्मानार्थ बळीराजा गौरव दिन घराघरांत साजरा व्हावा आणि यासाठी शेतकरी, नागरीकांनी पुढाकार घ्यावा. पुढील काळात बळीराजा गौरव महोत्सव गावागावात सुरू करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन सोपान पाटील यांनी केले. बलिप्रतिपदानिमित्त रावेर शहरातील व तालुक्यातील सर्व पक्ष व संघटनांच्यावतीने ‘बळीराजा गौरव दिन’ शुक्रवार दि.५ रोजी साजरा करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सोपान पाटील व सरपंच योगेश पाटील यांनी पूजन करून बळीराजांचा सत्कार केला. याप्रसंगी डॉ.राजेंद्र चैधारी, निलकंठ चौधरी, हरीश गणवणी, गोंडू महाजन, मन्सूर भाई, चांद तडवी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संजू चौधरी यांनी केले तर आभार सरपंच योगेश पाटील यांनी मानले.

बळीराजाचे स्मरण करणे गरजेचे
यावेळी बोलतांना ज्ञानेश्वर महाजन म्हणाले की, संत तुकोबांनी बळीराजाचा अभंगाद्वारे संघर्षाचा इतिहास अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. कष्टकरी बहुजनांचे प्रबोधन जनतेच्या मुक्तीदायी चळवळीसाठी आवश्यक आहे. यानिमित्ताने त्यांची वर्ग, वर्ण, जाती व लिंगभावविरोधी व्यापक एकजूट उभी करण्यासाठी बळीराजाचे स्मरण करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.