जळगाव शहर

गोदावरी लक्ष्मी बँकेत ठेवीदार, जेष्ठ ग्राहकाच्या हस्ते लक्ष्मी पूजन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ नोव्हेंबर २०२१ । जळगाव येथील गोदावरी लक्ष्मी को-ऑप बँक लि. ने बँकेचे ठेवीदार व जेष्ठ सभासद चंद्रकांत हुना तळेले यांचे हस्ते लक्ष्मीपूजन करण्यात आले. यामुळे नवीन पायंडा पडला आहे.

कोणत्याही सहकारी बँकेत अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या हस्ते दर दिवाळीला पूजन होत असते. पण गोदावरी लक्ष्मी बँकेने बॅकेंचे ठेवीदार व जेष्ठ सभासद चंद्रकांत हूना तळेले यांच्या हस्ते पूजन करून घेत नवीन पायंडा पाडला आहे. यावेळी गोदावरी लक्ष्मी बँकेचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, डॉ.वर्षा पाटील, सीए व तज्ञ संचालक सुनिल महाले, सुरेश झोपे, राजेंद्र कुरकुरे, बॅकेचे सभासद भारंबे, डॉ.अनिकेत पाटील, डॉ.सुषमा पाटील, व्यवस्थापकीय संचालक अशोक महाजन, नितीन भंगाळे, राजश्री महाजन व कर्मचारी उपस्थीत होते.

बँक व ग्राहक यांचे जिव्हाळयाचे नाते असते आणि यातूनच परिवार निर्माण झाला आहे. प्रत्येक वर्षी अध्यक्ष पूजा करतात पण माजी खासदार डॉ. उल्हास पाटील आणि उपाध्यक्ष सुभाष पाटील यांनी यावेळी ठेवीदार व जेष्ठ सभासद यांच्या हस्ते पूजा करावी, अशी संकल्पना मांडत जेष्ठ सभासद चंद्रकांत हुना तळेले यांना पूजेसाठी आमंत्रित केले होते. यावेळी इतर सभासद व ठेवीदारांना देखिल शुभेच्छा देण्यात आल्यात.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button