---Advertisement---
गुन्हे भुसावळ

कर्जाला कंटाळून भुसावळात व्यवसायकाची आत्महत्या

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ०५ नोव्हेंबर २०२१ । भुसावळ शहरातील विजय साऊंड सर्व्हिसच्या संचालक अशोक रामकृष्ण चौधरी यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना आज शुक्रवारी पहाटे उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

याबाबत असे की, अशोक चौधरी यांच्या मृत्यूमुळे परीसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. चौधरी यांच्यावर पतसंस्थांचे सुमारे 20 लाखांचे कर्ज झाले होते शिवाय कोरोना काळात व्यवसायही ठप्प झाल्याने कर्जाचे हप्ते थकल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा कठीण काळ सुरू असल्याने कार्यक्रमांना बंदी असल्याने साऊंड सर्व्हिस व्यवसाय चालवणेही कठीण झाले होते. त्यातच अशोक चौधरी यांनी व्यवसायासाठी सुमारे 20 लाखांचे कर्ज काढल्यानंतर या कर्जाचे हप्ते भरणेही जिकिरीचे जात असल्याने शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घरातच पोर्चच्या बंगळीला दोरीने त्यांनी गळफास घेत जीवनयात्रा संपवली. पहाटे कुटुंब उठल्यानंतर त्यांना ही घटना दिसताच कुटूंबियांनी आक्रोश केला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

 

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---