जळगाव शहर
अग्निशमन, सफाई कर्मचाऱ्यांसोबत धर्मरथ फाउंडेशनने साजरी केली दिवाळी
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ नोव्हेंबर २०२१ । सणासुदीच्या काळातही नेहमी कार्यरत राहणाऱ्या महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान व सफाई कर्मचाऱ्यांसोबत धर्मरथ फाउंडेशनने दिवाळी साजरी करून त्यांचे आभार मानले. यावेळी या सर्व कर्मचाऱ्यांना मिठाई व फराळचे वाटप करण्यात आले.
धर्मरथ फाउंडेशने सालाबादप्रमाणे यंदाही आगळ्या वेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी केली. महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी व अग्निशमन दलाचे कर्मचारी हे सण-उत्सव न पाहता नियमितपणे कार्यरत राहतात. त्यामुळे धर्मरथ फाउंडेशने यंदा त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करून त्यांचे आभार मानले. दिवाळीनिमित्त त्यांना मिठाई व फराळ देऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी धर्मरथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विनायक पाटील, संतोष भिंताडे, धनंजय चौधरी, मिलिंद बडगुजर व परिसरातील नागरिक उपस्थित होते.