⁠ 
शनिवार, मे 18, 2024

नवीपेठ कुंटनखाना प्रकरण : महिलेसह जागा मालकविरुद्ध गुन्हा दाखल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२२ । जळगाव शहरातील गोलाणी मार्केटसमोर असलेल्या गल्लीत एका इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर कुंटनखाना सुरू होता. शहर पोलिसांनी बुधवारी छापा टाकून कारवाई केली होती. पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दलाल महिलेसह जागा मालकविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील नवीपेठ परिसरात महावीर बँकेच्या मागील बाजूला असलेल्या एका इमारतीत वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय ठाकूरवाड यांना मिळाली होती. शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांच्यासह कर्मचारी रतन गिते, विजय निकुंभ, भास्कर ठाकरे, योगेश बोरसे, योगेश पाटील, गजानन बडगुजर, महिला कर्मचारी वैशाली पावरा, स्वप्नाली सोनवणे यांनी त्याठिकाणी दोन पंच आणि एक बनावट ग्राहक घेऊन जात छापा टाकला होता.

पोलिसांच्या छाप्यात फ्लॅटच्या हॉलसह ३ खोलीत १ ग्राहक पुरुष आणि दलाल महिलेसह ६ महिला मिळून आल्या होत्या. सर्वांना शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आल्यानंतर नवीपेठेतील एक महिला दलाल होती. महिला व पुरुषांना १५०० रुपये घेऊन ती खोली उपलब्ध करून देत होती. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांच्या फिर्यादीवरून दलाल महिला, जागा मालक वासुदेव बद्रीनाथ बेर्डे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.