जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मार्च २०२१ । शहरातील पिंप्राळा परिसरातील इंद्रनिल सोसायटीत रहिवाशी प्रशांत अनिल चौधरी (वय-२३) यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी १ लाख ७१ हजार रूपयांचे सोन्याचे दागिन्यांची चोरी केल्याचा प्रकार २३ मार्च रोजी सायंकाळी उघडकीला आला. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंप्राळा परिसरातील इंद्रनिल सोसायटीतील रहिवाशी प्रशांत चौधरी हे कुटुंबियांसह राहतात. १६ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता त्यांनी त्याच्याकडील सोन्याचे दागिने घरातील लोखंडी कपाटात ठेवले होते. २२ मार्च रोजी दुपारी ५ ते सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान त्यांच्या घरासमोर राहणारे सपना काळे यांच्याकडे हळदीचा कार्यक्रम होता. त्यानिमित्ताने प्रशांत चौधरी यांची आई अशा अनिल चौधरी ह्या घराला कडी लावून कार्यक्रमाला गेल्या.
दरम्यान, घराची कडी उघडून अज्ञात चोरट्यांने घरात प्रवेश करून घरातील कपाटात ठेवलेले २५ ग्रॅम वजनाचे सोन्याच्या बांगड्या, २५ ग्रॅमचे गळ्यातील हार व पदक, ११ ग्रॅमची सोन्याचे कानातले चाप आणि २० ग्रॅम वजनाच्या ४ सोन्याच्या अंगठ्या असा एकुण १ लाख ७१ हजार रूपये किंमतीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लांबविले. सायंकाळी आशा चौधरी ह्या घरात आल्यावर लोखंडी कपाटातील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे उघडकीला आले.
प्रशांत चौधरी यांच्या फिर्यादीवरून २३ मार्च रोजी रात्री उशीरा अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार गोपाल चौधरी करीत आहे.