कुलगुरू पदाच्या अर्जासाठी २५ नोव्हेंबरपर्यंत मुदत
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२१ । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात काही महिन्यांपासून प्रतीक्षा लागून असलेल्या कुलगुरू निवडीचा विषय आता मोकळा झाला आहे. प्रशासनाने कुलगुरू निवडी संबंधीची जाहिरात प्रकाशित केली असून, इच्छुकांना कुलगुरु पदासाठीचे अर्ज दिल्ली येथील नियुक्त अधिकाऱ्याकडे पाठवावे लागणार आहे. यासाठी २५ नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे.
सविस्तर असे की, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात काही महिन्यांपासून प्रतीक्षा लागून असलेल्या कुलगुरू निवडीचा विषय आता मोकळा झाला आहे. प्रशासनाने कुलगुरू निवडी संबंधीची जाहिरात प्रकाशित केली आहे. २५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत. विद्यापीठात कुलगुरूंसह प्र. कुलगुरू, कुलसचिव, वित्तलेखाधिकारी ही पदे प्रभारी आहेत. जुलैपासून कुलगुरू निवडीच्या जाहिरातीकडे लक्ष लागून होते. आता इच्छुकांना कुलगुरु पदासाठीचे अर्ज दिल्ली येथील नियुक्त अधिकाऱ्याकडे पाठवावे लागतील. २५ नोव्हेंबरची मुदत आहे. त्यानंतर आलेल्या अर्जाची छाननी होईल.
निवड अशी होईल.
उमेदवारांना १५ दिवसांची मुदत दिली जाईल. आलेल्या अर्जातून संख्येनुसार किमान २० अर्जांची निवड केली जाईल. यातील पाच उमेदवारांची निवड कुलपती करतील. त्यातून मुलाखतीद्वारे एका कुलगुरूंची निवड केली जाणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेस दोन महिने तरी लागू शकतात.