जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑक्टोबर २०२१ । जळगाव शहरात दुचाकी चोरीचे सत्र थांबता थांबेना. दुचाकी चोरीच्या घटनांमुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेय. दरम्यान, शहरातील शाहुनगरातील आश्विनी हॉस्पिटलसमोरून एकाची ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविली. याबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
युवराज प्रकाश वाणी (वय-२९) रा. शाहुनगर आश्विनी हॉस्पीटलसमोर जळगाव हे हातमजूरी करून आपला उदरनिर्वाह करतात. दरम्यान, त्यांच्याकडे कामासाठी लागणारी (एमएच १९ सीएम ४४४६) क्रमांकाची दुचाकी आहे. १६ ऑक्टोबर रात्री ११ ते १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास त्यांनी पार्किंगला लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी युवराज वाणी यांच्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक राजकुमार चव्हाण करीत आहे.