⁠ 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
Home | विशेष | पुरुषांना देखील येते उत्तम पाककृती, जाणून घेऊ आंतरराष्ट्रीय ‘शेफ डे’बद्दल..

पुरुषांना देखील येते उत्तम पाककृती, जाणून घेऊ आंतरराष्ट्रीय ‘शेफ डे’बद्दल..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । गौरी बारी । आपल्याला हॉटेलात गेल्यावर चमचमीत, मासेलेदार, आंबट-तिखट हवं त्या चवीचं जेवण मिळत असत. त्या मागे हात असतो तो तेथील आचारी म्हणजेच शेफ यांचा. आपल्या पाककृतीने अनेकांचे मन तृप्त करणाऱ्या शेफबद्दल आज आपण का बोलतोय, तर आज आहे २० ऑक्टोबर. हा दिवस आंतराष्ट्रीय शेफ दिवस म्हणून साजरा केला जात असतो.

काय आहे आंतरराष्ट्रीय ‘शेफ डे’चा इतिहास ? 

आंतरराष्ट्रीय शेफडेची सुरुवात २००४ मध्ये आदरणीय शेफ डॉ. बिल गॅलाघेर यांनी केली होती, ते त्यावेळी १०० पेक्षा जास्त शेफ असोसिएशनचे नेटवर्क असलेल्या वर्ल्डशेफचे अध्यक्ष होते. पाककृतीवरील शिक्षण, स्पर्धा, नेटवर्किंग आणि टिकाऊपणा आणण्यावर त्यांचे लक्ष केंद्रित आहे. हा दिवस जगभरातील मुलांना निरोगी खाण्याचे महत्त्व, शेफच्या करिअरला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या स्थानिक समुदायांना बदलण्यास मदत करण्यावर महत्व देणारा आहे. प्रत्येक वर्षी शेफ डे आणि त्यांचे भागीदार त्यांचे मिशन प्रसारित करण्यात मदत करण्यासाठी विविध थीम तयार करतात. त्यात वर्ल्डशेफची सुरुवात १९२० मध्ये झाली, स्विस कुक फेडरेशनने आंतरराष्ट्रीय शेफ असोसिएशनची कल्पना मांडली आणि अशा प्रकारे १९२८ मध्ये पॅरिसच्या सॉर्बोने येथे वर्ल्डशेफची स्थापना झाली.

आंतरराष्ट्रीय शेफ डेची रचना केली गेली. कारण, आपण सर्व शेफच्या महत्त्वाच्या भूमिकेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी फक्त गृहिणींच्याच अंगी पाककृतीची कला नसते तर अनेक हॉटेलमध्ये जास्त प्रमाणात पुरुष शेफ आढळून येतात. पुरुषांच्या हाताला देखील स्वाद असतो तर पुरुष देखील गृहिणीप्रमाणे उत्तम जेवण बनवून देऊ शकतो. हा महत्वाचा संदेश देखील या दिवसाच्या निमित्ताने दिला जात असतो.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह