⁠ 
रविवार, मे 19, 2024

वीज पडून मृत्यू झालेल्या महिलेच्या वारसांना शासनाकडून ४ लाखांची मदत

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑक्टोबर २०२१ । बोदवड तालुक्यातील चिंचखेड प्र. येथील एका महिलेच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची घटना १ ऑक्टोबर रोजी घडली होती. दरम्यान, मयत महिलेच्या वारसांना शासनाकडून नुकतीच ४ लाख रुपयांची मदत करण्यात आली. आ.चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रक्कमेचा धनादेश कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आला.

चिंचखेड प्र. (ता. बोदवड) येथील पार्वता भिल यांचा दि.१ ऑक्टोबर रोजी अंगावर वीज पडून मृत्यू झाला होता. दरम्यान, झालेल्या घटनेचा तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्याच्या वारसास शासनाकडून तात्काळ मदत मिळावी, अशा सूचना आमदार चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, वैद्यकीय अधिकारी यांना दिल्या होत्या. जिल्हा प्रशासनानेही या घटनेची तात्काळ दखल घेत आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत शासनाकडून 4 लाख रुपयाची मदत मयत महिलेच्या कुटुंबियांना करण्यात आली. आ.चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रक्कमेचा धनादेश कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी तहसीलदार प्रथमेश घोलप, शिवसेना तालुका प्रमुख गजानन खोडके, नगरसेवक आनंदा पाटील, सलीम कुरेशी, देवा खेवलकर, धनराज गंगतिरे, संजय गायकवाड, शांताराम कोळी, हर्षल बडगुजर, पियुष महाजन, मुकेश वानखेडे, लाला पाटील, दिपक माळी, गोपाल पाटील, जीतू तायडे यांसह मंडळ अधिकारी, तलाठी, महसूल सहाय्यक आदी उपस्थित होते.