⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024
Home | जळगाव जिल्हा | ‘या’ सरकारी योजनेत करा गुंतवणूक; मिळेल चांगला परतावा

‘या’ सरकारी योजनेत करा गुंतवणूक; मिळेल चांगला परतावा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑक्टोबर २०२१। गुंतवणूक करायची असेल तर गुंतवणूक करताना सुरक्षितता आणि चांगला परतावा या गोष्टींचा प्राधान्याने विचार केला पाहिजे. बाजारात बचत आणि गुंतवणूकीच्या अनेक योजना उपलब्ध आहे. परंतु, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बहुतेक लोक हे सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करतात. अशा लोकांसाठी इतर सरकारी बचत योजनांसह राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) योजनेत गुंतवणूक करणे सुरक्षित आणि फायद्याचे ठरणार आहे.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) योजनेत तुम्हाला नक्कीच चांगला परतावा मिळेल, सोबतच गुंतविलेल्या पैशाला पूर्णपणे सुरक्षितता आहे. तुम्ही गुंतवणूक केलेल्या बँकेने डिफॉल्ट केले तर तुम्हाला फक्त ५ लाख रुपये परत मिळतील. पण पोस्ट ऑफिसमध्ये असे नाही. या व्यतिरिक्त, पोस्ट ऑफिस बचत योजनांमध्ये गुंतवणूक अगदी कमी रकमेने सुरू केली जाऊ शकते. पोस्ट ऑफिस लघु बचत योजनांमध्ये राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी) देखील समाविष्ट आहे. तुम्ही या योजनेत गुंतवणूक करून करमुक्तीचा लाभ देखील घेऊ शकता.

६.८ टक्के व्याजदर
पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये दरवर्षी ६.८ टक्के व्याज दिले जात आहे. तथापि, ते केवळ मॅच्युरिटीवर दिले जाईल. जर तुम्ही या योजनेत १,००० रुपये गुंतवणूक केली तर पाच वर्षांनंतर ही रक्कम १३८९.४९ होईल. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रात किमान १,००० रुपयांची गुंतवणूक करता येते. गुंतवणूक १०० रुपयांच्या पटीत करावी लागेल. योजनेत गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही. या योजनेअंतर्गत, तुम्ही स्वतंत्र किंवा तीन प्रौढांपर्यंत मिळून संयुक्त खाते उघडू शकतात. अल्पवयीन किंवा मानसिक आजार असलेल्या व्यक्तीच्यावतीने पालक आणि १० वर्षांपेक्षा जास्त वयाचे अल्पवयीन स्वतःच्या नावावर खाते उघडू शकतात.

करात मिळेल सूट
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) योजनेत जमा केलेल्या रकमेवर आयकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत कपातीसाठी दावा केला जाऊ शकतो. ठेवीच्या तारखेपासून पाच वर्षे पूर्ण झाल्यावर ठेव मॅच्युअर होईल. या योजनेत एखादी व्यक्ती कितीही खाती उघडू शकते. सुरक्षा म्हणून गहाण किंवा हस्तांतरित केले जाऊ शकते. यासाठी संबंधित व्यक्तीला संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये योग्य अर्ज सादर करावा लागतो. यासह, ज्याला तो गहाण ठेवत आहे त्याच्याकडून त्याला मंजुरीचे पत्रही द्यावे लागेल. ही योजना ५ वर्षापूर्वी काही विशिष्ट परिस्थितीत बंद केली जाऊ शकते. खातेधारकाचा मृत्यू झाल्यास किंवा संयुक्त खाते झाल्यास, सर्व खातेधारकांचा मृत्यू झाल्यास खाते परिपक्वतापूर्वी बंद करता येते. न्यायालयाच्या आदेशानुसार ते बंदही करता येते.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह