⁠ 
रविवार, मे 19, 2024

गुलाबरावांच्या डोक्यात दुष्काळ आहे ..वाचा कोणी मारला टोला!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑक्टोबर २०२१ । गुलाब चक्रीवादळामुळे राज्यात झालेली अतिवृष्टी आणि त्यामुळे निर्माण झालेली पुरपरिस्थिती यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या मदतीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. यावरुन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला होता. त्यानंतर आता मनसेने गुलाबराव पाटलांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देत कडक शब्दांत टीका केली आहे.

मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी ट्विट करत गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला. गुलाब चक्रीवादळामुळे समजलं की गुलाबरावांच्या डोक्यात किती दुष्काळ आहे ते.राजसाहेब यांनी केलेली मागणी सध्याच्या परिस्थितीत अतिशय योग्य आहे.पण संवेदनाहीन गुलाब ना शेतकऱ्यांचं नुकसान कसं दिसणार?भ्रष्टाचाराचा महापूर आणि अकलेचा दुष्काळ,असले नेते आपल्याला मिळाले हेच तर आपलं दुर्दैव आहे अस अमेय खोपकर यांनी म्हंटल.

गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले होते-

राज ठाकरे यांनी मागणी केली हे मान्य. मागणी करणं सोपं आहे, मात्र निर्णय पंचनाम्यानंतर होईल. परिस्थिती पाहून दुष्काळ जाहीर केला जाईल. राज ठाकरे यांनी मागणी केली म्हणजे काही मोठं काम केलं नाही. कुणीही राजकारण करू नये,’ असं पाटील म्हणाले होते.