⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

दुर्दैवी : वीज कोसळल्याने दोघांचा मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑक्टोबर २०२१ । जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये वीजेच्या कडकडटासह आज पुन्हा पावसाने हजेरी लावली. दरम्यान,अंगावर वीज कोसळल्याने जिल्ह्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथील गुरे चारणाऱ्यासाठी गेलेल्या ज्ञानेश्वर सुका बाउस्कर (धनगर) यांच्या अंगावर दुपारच्या वेळेस वीज कोसळली. त्यात त्यांचा जागेची मृत्यू झाला. तर दुसरी घटना मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी खुर्द येथील शेतकरी अजय रुस्तम घोडकी (वय 38) हे हरताळा शिवारातील स्वतःच्या शेतामध्ये काम करत असताना त्यांच्या अंगावर आज दुपारी २ ते २:३० वाजेच्या सुमारास वीज पडल्यान मृत्यु झाला आहे.

दरम्यान, डोंगर कठोरा येथील ज्ञानेश्वर बाविस्कर हे आपल्या कुटुंबियासह राहतात. गुरे चारून उदरनिर्वाह करतात. आज आभाटा शिवारात आज १ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता गुरे चारत असतांना वीजेच्या कडकडटासह पाऊस सुरू झाला. त्यावेळी ज्ञानेश्वर बाऊस्कर हे टेकडीवर उभे होते. त्याचवेळी त्यांच्या अंगावर वीज पडल्याने ते टेकडीवरून खाली कोसळले त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अशी माहिती सोबत असलेल्या नागरीकांनी सांगितले. घरातील कर्ता पुरूष गेल्या हळहळ व्यक्त होत आहे.