जळगाव जिल्हा
परवान्याशिवाय विकता येणार नाही कोणतेही खाद्य पदार्थ
जळगाव लाईव्ह न्युज | ३० सप्टेंबर २०२१ | एक ऑक्टोबरपासून अन्न सुरक्षा मानक प्राधिकरणाच्या परवाना घेणे आता सक्तीचे झाले आहे. या द्वारे मिळणाऱ्या क्रमांक आल्या शिवाय खाद्य विक्रेत्याला खाद्यपदार्थ विकणे अशक्य होणार आहे. खाद्य क्रमांक आल्या शिवाय विक्रेत्याला आता कोणतीही खाद्यवस्तू विकता येणार नाहीये. यामुळे व्यापारी वर्गात प्रचंड नाराजी पसरली आहे.
अन्नसुरक्षा आणि मानद प्राधिकरणाने सर्व राज्यांच्या आरोग्य सुरक्षा आणि नियमन विभागाच्या नवीन सूचना जारी केल्या आहेत. खाद्य व विक्रेत्यांना परवाना घेणे सक्तीचे आहे तसेच त्यासाठी दर दोन वर्षांनी एक दिवसाचे प्रशिक्षण घेणे बंधनकारक आहे.
हॉटेल, ढाबा, किराणा, दुकान, मीठाई, दूध व इतर सर्व खाद्यपदार्थ व्यवसायिकांना सक्तीचे आहे. यासाठी अन्नपदार्थ विक्रेत्याला केंद्र सरकारची मान्यता असलेला परवाना दिला जाणार आहे.