जळगाव। २० मार्च २०२१ । जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. आज दिवभरात जिल्ह्यात ९७१ नवे कोरोना बाधित रूग्ण आढळून आले. आज पहिल्यांदाच जळगाव शहरापेक्षा चोपडा तालुक्यात जास्त रूग्ण आढळले आहेत. चोपडा तालुक्यात तब्बल २६६ पॉझिटीव्ह रूग्ण असल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रशासनाने पाठविलेल्या अहवालात आज जिल्ह्यात ९७१ कोरोना बाधीत आढळून आले आहेत.त्यामुळे जिल्ह्यात एकूण बाधित ७६,३८६ आहे. त्यात ६५४७० रूग्ण बरे झाले आहे. दरम्यान, आज ७५२ रूग्ण बरे देखील झाले असून ८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर १९५, जळगाव तालुका-९; भुसावळ-५२; अमळनेर-२५; पाचोरा-१६; भडगाव-२४; धरणगाव-४२; यावल-५४; एरंडोल-९६; जामनेर-४८; रावेर-३७; पारोळा-३७; चाळीसगाव-६३; मुक्ताईनगर-२; बोदवड-२; इतर जिल्ह्यातील-४ असे रूग्ण आढळून आले आहेत.