चाळीसगाव
डोंगरीत तरुण वाहून गेला; प्रशासनाकडून शोध सुरू
जळगाव लाईव्ह न्यूज । तुषार देशमुख । चाळीसगाव तालुक्यातील गोरखपुर तांडा येथील २५ वर्षीय तरुण शेतात जात असताना डोंगरी नदीत वाहून गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरम्यान बेपत्ता झालेल्या तरुणाचा शोध प्रशासनाकडून सुरू आहे.
चाळीसगाव तालुक्यातील गोरखपुर तांडा येथील सोमनाथ रामजी राठोड (वय-२५) हा तरुण सकाळच्या सुमारास शेतात गेला होता. तो गावालगत असलेल्या डोंगरी नदीच्या पात्रात वाहून गेल्याची घटना आज बुधवार २९ सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोध कार्य सुरु केले. सोमनाथ रामजी राठोड या तरुणाचा प्रशासनाकडून व ग्रामस्थांकडून सकाळपासून शोध सुरू असून अद्यापपर्यंत तो कुठेही मिळून आलेला नाही.