जळगाव जिल्हा

दुचाकीच्या डिक्कीतून ३८ हजाराची रोकड लांपास

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ सप्टेंबर २०२१ । विसनजी नगरातील क्रिमसन फूड दुकानासमोर लावलेली दुचाकीच्या डिक्कीतुन अज्ञात चोरट्यांनी ३७ हजार ८०० रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हापेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किशोर पन्नालाल भंडारी (वय-६६) रा. विसनजी नगरात राहतात. काल गुरूवारी २३ सप्टेंबर रोजी साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान विसनजी नगरातील होमगार्ड कार्यालयाजवळी क्रिमसन फूड या दुकानासमोर त्यांनी स्कूटर (एमएच १९ एआर ४४०१) पार्किंगला लावली होती. अज्ञात चोरट्यांनी फायदा घेत डिक्कीत ठेवलेले ३७ हजार ८०० रुपयांची रोकड तसेच मोबाईल चार्जर, पेन ड्राईव्ह असा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले.  किशोर भंडारी यांनी जिल्हापेठ पोलीसात धाव घेतली.  भंडारी यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक जुबेर तडवी करीत आहे.

Related Articles

Back to top button