९० वर्षीय वयोवृध्दाची फास घेऊन आत्महत्या
जळगाव लाईव्ह न्यूज । २४ सप्टेंबर २०२१ । शहरातील ९० वर्षीय वयोवृध्दाने आत्महत्या केल्याची घटना घडली. पिंप्राळा हुडको येथे राहणाऱ्या वृद्धाने राहत्या घरात गळफास घेवून हि आत्महत्या केली आहे. रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शिवराम शंकर सोनवणे (वय-९०) रा. पिंप्राळा हुडको असे मयत वृध्दाचे नाव आहे. रामानंदनगर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, शिवराम सोनवणे हे महापालिकेतील सेवानिवृत्त कर्मचारी आहे. ते विधवा सुन व नातवंडे यांच्यासह राहतात. त्यांचा मुलगा दोन वर्षांपुर्वी दुर्धर आजाराने निधन झाले आहे. त्यांची सुनबाई माहेरी आईवडीलांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. काल गुरूवार २३ सप्टेंबर रोजी घरी कुणीही नसतांना त्यांनी बाथरूमच्या कडीकोयंडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे सायंकाळी ७ वाजता उघडकीला आली. सायंकाळी सुनबाई घरात आल्यावर हा प्रकार लक्षात आला. दरम्यान, आत्महत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. निता भोळे यांच्या खबरीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुनिल पाटील, महेश पवार करीत आहे.