तरूणाची गळफास घेवून आत्महत्या
जळगाव लाईव्ह न्यूज । २४ सप्टेंबर २०२१ । आसोदा येथे राहणाऱ्या ३६ वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घडली उघडकीस आली आहे. दारूच्या नशेत हे कृत्य त्याने केले असे म्हटले जात आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव तालुक्यातील आसोदा येथील रहिवाशी शेतकरी रमेश अशोक पाटील (वय-३६) आपल्या पत्नी व दोन मुलीसह राहतात. शेतीकाम करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. २३ सप्टेंबर रोजी त्यांची पत्नी ह्या शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या. तर दोन्ही मुली कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. सायंकाळी ७ वाजेच्या पुर्वी रमेश पाटील यांनी राहत्या घरातील पुढच्या खोलीत दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांची पत्नी सायंकाळी शेतातून घरी आल्या त्यावेळी हा प्रकार समोर आला. त्यांचा मृतदेह खाली उतरवून तातडीने जिल्हा रूग्णालयाने नेण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ. निता भोळे यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक किरण आगोणे करीत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, दोन भाऊ असा परिवार आहे.