उड्डाणपुलाला संत नामदेव महाराज यांचे नाव देण्याची मागणी
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ सप्टेंबर २०२१ । गुजराल पेट्रोल पंपासमोर उभारण्यात आलेल्या उड्डाण पुलाला संत शिरोमणी श्री. नामदेव महाराज यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी जळगाव शहर शिंपी समाज हितवर्धक संस्था व पिंप्राळा शिंपी समाज, दादावाडी परिसर शाखा यांच्यातर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शहरातील गुजराल पेट्रोल पंपासमोर नव्याने उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाला वारकरी संप्रदायाचे आद्य प्रचारक संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचे नाव देण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन मंगळवार दि. २१ रोजी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांना समस्त शिंपी समाज बांधवांच्यावतीने देण्यात आले. निवेदन देतेवेळी, जळगाव शहर शिंपी समाज अध्यक्ष राजेंद्र सोनवणे, सचिव चंद्रकांत जगताप, प्रिंपाळा शिंपी उपाध्यक्ष ऋषिकेश कापुरे, जिल्हाध्यक्ष दत्तात्रेय कापुरे, अ.भा. शिंपी समाज उपाध्यक्ष मुकुंदराव मेटकर, मनोज भांडारकर, गणेश मेटकर, सुरेश सोनवणे,अनिल खैरनार, प्रविण कापुरे , दादावाडी परिसर अध्यक्ष शैलेंद्र मांडगे, शिवदास आबा सावळे आदी उपस्थित होते.