⁠ 

प्रवाशांसाठी महत्वाची बातमी : भुसावळ – देवळाली मेमू गाडीमध्ये बदल, काय आहे वाचा..

जळगाव लाईव्ह न्यूज : 8 डिसेंबर 2023 : भुसावळ – देवळाली मेमू गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे भुसावळ विभागात उद्या डी 09 डिसेंबर आणि 10 डिसेंबर रोजी लाहविट – देवळाली स्टेशन दरम्यान “इंटरमीडिएट ब्लॉक हट” (IBH) चे कार्य करिता नॉन इंटरलॉकिंग चे कार्य करण्यात येणार आहे. त्याकरिता भुसावळ – देवळाली मेमू गाडी मध्ये बदल करण्यात आला आहे.तो बदल पुढीलप्रमाणे –

१) गाडी क्रमांक ११११४ भुसावळ -देवळाली मेमू दिनांक ०९.१२.२०२३ रोजी नाशिकरोड स्टेशन शॉर्ट टर्मिनेट करण्यात आली आहे. गाडी नासिक ते देवळाली रद्द राहील.
२) गाडी क्रमांक -११११३ देवळाली -भुसावळ मेमू दिनांक १०.१२.२०२३ रोजी नासिक स्टेशन येथून आपल्या नियोजित वेळेत सुटेल. देवळाली ते नासिक मेमू रद्द राहील.
कृपया प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केलं आहे.