दोन गावठी कट्ट्यांसह तिघे ताब्यात; एक जण फरार
जळगाव लाईव्ह न्यूज । २० सप्टेंबर २०२१ । एरंडोल तालुक्यातील सावदे प्र.चा. येथील दोघांसह चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील एका अल्पवयीन युवकांवर रविवार दि.१९ रोजी पाळधी पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. तिघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून दोन गावठी कट्ट्यांसह दोन जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात अवैधरित्या गावठी कट्टे बागळण्याचे प्रमाण वाढले असून जिल्ह्यात गावठी कट्टे बागळणाऱयांवर दररोज एकतरी कारवाई केली जात आहे. अवैधरित्या गावठी कट्टे बागळण्याचे प्रमाण लक्षात घेऊन अशांविरुद्ध कारवाई करण्याची विशेष मोहीम पोलीस प्रशासनातर्फे हाती घेण्यात आली आहे. पाळधी पोलीस दूरक्षेत्राचे सपोनि. गणेश बुवा यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रविवार दि. १९ रोजी एरंडोल तालुक्यातील सावदे प्र.चा. येथे पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास पाळधी पोलिसांकडून कारवाई करण्यात येऊन सुनील बापू सोनवणे (वय-२५), दिलीप हिरामण सोनवणे (वय-२६), दोघे रा. सावदे प्र.चा, ता. एरंडोल यांच्यासह चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील रहिवासी असलेल्या एका अल्पवयीन युवकास ताब्यात घेण्यात आले. तिघांकडून दोन गावठी बनावटीच्या पिस्तोल, दोन जिवंत काडतूससह २ मोटारसायकल असा ७६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांचा चौथा साथीदार काल्या उर्फ भूषण तुकाराम मोरे रा. परधाडे, ता.पाचोरा हा मात्र फरार होण्यास यशस्वी झाला आहे. त्याचा शोध सुरु असून चौघांविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि. गणेश बुवा करीत आहेत.
यांनी केली कारवाई
सपोनि. गणेश बुवा, सहा. फौजदार नसीम तडवी, पोहेकॉ. विजय चौधरी, संजय महाजन, अरुण निकुंभ, गजानन महाजन, पोना. उमेश भालेराव, पोकॉ. अमोल सूर्यवंशी, ज्ञानेश्वर बाविस्कर, किशोर चंदनकर, दत्तात्रय ठाकरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.