⁠ 
शनिवार, मे 18, 2024

सातपुड्यात तब्बल ५० हजार सिडबॉल्सचे विक्रमी रोपण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ सप्टेंबर २०२१ । सातपुडा पर्वतरांगेत गौऱ्यापाडा व परिसरातील जंगलात दरवर्षी वणव्यांमुळे जंगल क्षेत्र कमी होत आहे.पर्वतराजीत हिरवळ वाढावी ह्या दृष्टीने योगी(युथ ऑर्गनायझेशन फॉर ग्रीन ) व ड्रीम फौंडेशन मार्फत 50 हजार सिडबॉल्सचे रोपण शिक्षक दिनाचे औचित्य साधत मुळजी जेठा महाविद्यालयाच्या एन.सी.सी. युनिट व गावातील तरुणांच्या च्या मदतीने करण्यात आले.

योगी मार्फत गौऱ्यापाडा व सबंधित परिसरात शाश्वत ग्रामविकसनाचे कार्य सुरु आहे.या कार्याची,हा उपक्रम महत्वाची साखळी ठरला.यावेळी एन.सी.सी. कॅडेट्स व ग्रामस्थांशी संवादाचा छोटेखानी कार्यक्रम देखील घेण्यात आता ज्यात सिडबॉल्स बाबत व त्याच्या रोपानाबाबत मार्गदर्शन करण्यात आले’उद्या सुखाने जगायचे असेल तर आज निसर्गाची काळजी घ्यायलाच हवी,सातत्याने होत असलेले वातावरणातील बदल हे धोकादायक असून वेळीच अशी सकारात्मक पाऊले उचलणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मान्यवरांनी केले.यावेळी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) चे प्रकल्प अधिकारी श्री.हिमांशू स्वान यांची प्रमुख उपस्थिती होती.

गौऱ्यापाडा परिसरात फक्त हिरवळ न करता त्याचा लोकांच्या उपजीविकेला फायदा व्हावा,हे लक्षात घेता बांबू,निंबू,सीताफळ,आवळा,आंबा अश्या प्रकारच्या झाडांच्या एकूण ५० हजार सिडबॉल्स चे रोपण,जंगलातील टेकड्या व छोट्या ओहोळांच्या किनाऱ्यावर केले.या सिडबॉल्सची निर्मिती प्रक्रिया देखील गांडूळ खत,शेणखत,गोमुत्र आदीचा वापर करून पूर्णतः सेंद्रिय पद्धतीने करण्यात आली होती.

या रोपण उपक्रमात मुळजी जेठा महाविद्यालायाच्या एन.सी.सी. युनिटच्या ५२ कॅडेट्स व योगी च्या गौऱ्यापाडा ग्रामस्वराज समिती च्या तरुणांचा सहभाग वाखाणण्याजोगा होता. यावेळी एन.सी.सी चे अधिकारी डॉ.वाय.एस.बोरसे, सुभेदार सुनील पालवे व श्री.राजू राम तसेच ड्रीम फाउंडेशनचे श्री.गजानन काळे सर, सुश्री ज्योत्ना मेहकर, महादेव आगरकर, उमेश राठोड यांची उपस्थिती होती. प्रा.संदीप निंबाजी पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगी च्या प्रकाश बारेला, नितीन वारुळे, सुनील महाजन, वीरभूषण पाटील, पूर्वा जाधव, दिव्यांक सावंत, प्रणील चौधरी, गिरीश पाटील व गौऱ्यापाडा ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.