⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | सावधान.. उत्तर महाराष्ट्राला पुन्हा ४ दिवस अतिवृष्टीचा इशारा

सावधान.. उत्तर महाराष्ट्राला पुन्हा ४ दिवस अतिवृष्टीचा इशारा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ सप्टेंबर २०२१ । गेल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले होते. चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीमुळे कितीतरी संसार उघड्यावर पडले, शेकडो जनावरे वाहून गेली. शासनाच्या हवामान खात्याने उत्तर महाराष्ट्राला आजपासून पुन्हा ४ दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला असून नागरिकांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

पावसाळा जवळपास संपुष्ठात येत असून गेल्या दिवसापासून जिल्ह्यात समाधानकारक पाऊस होत आहे. गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पावसाने शहरासह जिल्ह्याला चांगलेच झोडपले असून अनेक ठिकाणी पडझड आणि नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. आयएमडी मुंबई वेधशाळेने नवीन अलर्ट जारी केला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे आणि नगर जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

आयएमडीच्या इशारानुसार आज दि.६ ते ८ सप्टेंबर दरम्यान संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात मध्यम ते अतिवृष्टी स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तसेच १० रोजी जळगाव सोडून उर्वरीत जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. वेधशाळेच्या इशारानुसार नागरिकांनी आणि विशेषतः नदी काठाच्या नागरिकांनी दक्षता बाळगणे आवश्यक आहे.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.