---Advertisement---
जळगाव जिल्हा

चाळीसगाव ग्रामीण भागातील बससेवा सुरळीत करा ; राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे निवेदन

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ सप्टेंबर २०२१ । तालुक्यासह जिल्ह्यात कोरोना संसर्ग कमी झाला आहे शासनाने देखील नियम शिथील केले असून कोरोना काळापासून आजवर बंद असलेली ग्रामीण भागातील बस सेवा पुन्हा पूर्ववत करून विद्यार्थ्यांना होणारा त्रास कमी करावा अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली

ncp jpg webp

चाळीसगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील बस सेवा सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने विविध मागणीच्या निवेदन दिले, यावेळी सध्या आठवी ते बारावी व महाविद्यालय वर्ग सुरू करण्यात आले आहेत तसेच प्रवेश प्रक्रिया साठी व कागदपत्रे पडताळणीसाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरात यावे लागते मात्र बस सेवा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत याची तात्काळ दखल घ्यावी यासाठी मा.आ.दादासो.राजीव देशमुख यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चाळीसगांवच्या वतीने तालुक्यातील बससेवा सुरू करावी यासाठी चाळीसगांव बसस्थानक आगार प्रमुख निकम सर यांच्याकडे निवेदन देण्यात आले

---Advertisement---

यावेळी विद्यार्थी शहराध्यक्ष गौरव पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मोहित भोसले, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष शुभम पवार, प्रकाश पाटील, पिनू सोनवणे, लवेश राजपूत, विशाल चौधरी, कौस्तुभ राजपूत, भूषण मोघे, धीरज पाटील, आशुतोष राजपूत, राजरत्न पगारे, लोकेश पाटील, भुषण पाटील, बंटी पाटील, घनश्याम जगताप, अमोल पाटील, रुपेश वानखेडे विद्यार्थी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---