महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामाची गती वाढविण्यासाठी प्रत्येक विभागाच्या कामांचा घेतला जाणार आढावा
जळगाव लाईव्ह न्यूज । २ सप्टेंबर २०२१ । चिन्मय जगताप । महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामाची गती वाढविण्यासाठी प्रत्येक विभागाच्या कामांचा आढावा घेतला जाणार आहे. कामाची गती वाढविण्यासाठी विभागांचा कामाचा आढावा आवश्यक असल्यामुळे महानगरपालिकेतील सर्व विभागांचा महिन्यातून दोनदा आढावा घेतला जाणार आहे. असे आदेश मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी संबंधीत विभागांना दिले आहेत.
या विषयावर घेतला जाणार आढावा.
१) महासभा व स्थायी समिती यांच्या ठरावांची अंमलबजावणी
२) मनपा अर्थसंकल्पातील विविध तरतुदींप्रमाणे प्राप्त होणाऱ्या उत्पन्नाचा आढावा.
३) वेगवेगळ्या शासन अनुदानित योजनेअंतर्गत विविध विकास कामांचे नियोजन व अंमलबजावणी
४) न्यायालयीन प्रकरणे
५) शासन स्थरावरील विविध प्रकरणे
६) प्रशासकीय कामाबाबतची वर्कशीट
७) प्रलंबित लेखा परीक्षण आक्षेप.
‘या’दिवशी ‘या’ विभागाचा घेतला जाणार आढावा
- पहिला व तिसरा सोमवारी कर आकारणी व संकलन विभागाचा आढावा घेतला जाणार आहे.
- दुसऱ्या व चौथ्या सोमवारी आस्थापना व भांडार विभाचा आढावा घेतला जाणार आहे.
- पहिल्या व तिसऱ्या मंगळवारी प्रकल्प विभाचा आढावा घेतला जाणार आहे.
- दुसऱ्या व चौथ्या मंगळवारी पाणी पुरवठा व विद्युत विभाचा आढावा घेतला जाणार आहे.
- .पहिल्या व तिसऱ्या बुधवारी सार्वजनिक बांधकाम विभाचा आढावा घेतला जाणार आहे.
- दुसऱ्या व चौथ्या बुधवारी पाणीपुरवठा व विद्युत विभाचा आढावा घेतला जाणार आहे.
- पहिल्या व तिसऱ्या गुरुवारी आरोग्य व घनकचरा विभाचा आढावा घेतला जाणार आहे.
- , दुसऱ्या व चौथ्या गुरुवारी मालमत्ता व्यवस्थापन विभाचा आढावा घेतला जाणार आहे.
- पहिल्या व तिसऱ्या शुक्रवारी नगररचना व अतिक्रमण विभाचा आढावा घेतला जाणार आहे.
- दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी महिला व बालकल्याण तसेच दिव्यांग कल्याण व अग्निशमन विभाग आणि एन यु एल एम विभाचा आढावा घेतला जाणार आहे.