⁠ 
रविवार, मे 19, 2024

नशिराबाद न्यू इंग्लिश स्कूलमध्ये टिळक पुण्यतिथि व अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त नर्सरी विद्यार्थांना गणवेशाचे वाटप!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । सुनिल महाजन । नशिराबादच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित साधून शाळेतील नर्सरी विद्यार्थांना शाळेमार्फत गणवेश वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे जनार्दन माळी तर मंचावर संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. विकास चौधरी, कार्याध्यक्ष योगेश पाटील, संचालक डॉ. संदीप महाजन व मुख्याध्यापक प्रविण महाजन हे होते.

लोकमान्य टिळक पुण्यतिथि व अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिप प्रज्वलन करण्यात आले. सर्व नर्सरी विद्यार्थांना शाळेमार्फत गणवेश वाटप करण्यात आले. कार्यक्रमात गुरुपौर्णिमा निमित्त आयोजित वकृत्व स्पर्धेचा निकाल जाहिर करण्यात आला. यात प्रथम योजना बर्हाटे, द्वितीय ऋषी पाटिल व तृतीय ईश्वरी करुले यांना प्रशस्तीपत्र व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. लोकमान्य टिळक पुण्यतिथि निमित्त वकृत्व स्पर्धा घेण्यात आली. यात प्राथमिक विभागाचे २५ विद्यार्थांनी सहभाग नोंदविला व सर्वांनी उत्तमरीत्या लोकमान्य टिळकांच्या जीवनातील बालपणाच्या गोष्टी सांगितल्या.

तर शिक्षक भाषणात उपशिक्षिका लीना पाटील यांनी लोकमान्य टिळकांच्या जीवनाबद्दल इतिहास सांगितला. शितल चावरे यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या जीवन कार्याबद्दल माहिती सांगितली. अध्यक्षीय भाषणात जनार्दन माळी यांनी विद्यार्थांना आपण सर्वांनी लोकमान्य टिळकांचा आदर्श आपल्या जीवनात घ्यायला हवे असे सांगितले. कार्यक्रमाचे नियोजन वंदना चौधरी यांनी केले तर सूत्र संचालन तुषार रंधे व आभार ज्योती बारी यांनी केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.