जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑगस्ट २०२१ । शहरातील गिताई नगरात राहणाऱ्या एका २५ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेतल्याची घटना आज सायंकाळी उघडकीस आली. योगेश रामचंद्र मराठे असे मयताचे नाव असून तो भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे समजते.
ज्ञानदेव नगर चौकाजवळ असलेल्या गिताई नगरात राहणारा योगेश मराठे हा भाजीपाला विक्रीचे काम करून दोन भावांसह कुटुंबाला हातभार लागतो.
मंगळवारी दि.३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास त्याने राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. योगेशचे वडील रामचंद्र बुधो मराठे हे घरी आल्यानंतर मुलाने गळफास घेतल्याने लक्षात आले. शेजारच्या मुलांनी तातडीने योगेशला खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले.
याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार परिस महाजन करीत आहे. मयत योगेशच्या पश्चात आई राधाबाई, वडील रामचंद्र मराठे, हेमंत आणि दीपक हे दोन भाऊ असा परिवार आहे. दरम्यान, योगेशच्या आत्महत्येचे नेमके कारण समजून आले नाही.