अमळनेर खून प्रकरणातील आरोपीच्या काही तासात मुसक्या आवळल्या

ऑगस्ट 27, 2021 2:53 PM

जळगाव लाईव्ह न्युज | २७ ऑगस्ट २०२१ | अमळनेर येथे पैशांच्या वादातून झालेल्या तरुणाच्या खून प्रकरणातील आरोपीच्या चोपडा येथून मुसक्या आवळल्या आहे. कैलास पांडुरंग शिंगाणे असे संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत असे कि, हशीमजी प्रेमजी संकुलाच्या दुसऱ्या मजल्यावर आज पहाटे प्रकाश पाटील या तरुणाचा पैशाच्या वादातून खून करण्यात आला. सकाळी सफाई कामगार झाडलोट करण्यासाठी गेले असता सदर प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना घडल्या नंतर संशयित आरोपी कैलास हा फरार झाला होता.

घटनेच्या अवघ्या काही तासात संशयित आरोपी कैलास याला चोपडा येथून ताब्यात घेण्यात आले आहे.अमळनेर पोलिसांच्या या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक होत आहे.

दरम्यान जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी घटनास्थळी भेट दिली असून संपूर्ण महिती घेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल कौतुक केले आहे. या संपूर्ण प्रकरणात सहा पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत कमी वेळात आरोपी ताब्यात घेण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. आरोपीला चोपडा येथून सुनील हटकर व मिलिंद भामरे यांनी पकडून अमळनेर पोलीस ठाण्यात आणले आहे व आज चौकशी अंती उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now