⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने एरंडोल शहर स्वच्छ सुंदर व हिरवेगार करण्यासाठी प्रयत्नशील – नवनियुक्त मुख्याधिकारी विकास नवळे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑगस्ट २०२१ । एरंडोल नगराध्यक्ष रमेश सिंग परदेसी उपनगराध्यक्षा आरती महाजन यांच्यासह सर्व नगरसेवक व नगरसेविका यांना विश्वासात घेऊन त्यांच्या सहकार्याने एरंडोल शहर स्वच्छ सुंदर व वृक्षारोपण करून हिरवेगार करण्याचा मनोदय नवनियुक्त मुख्याधिकारी विकास नवळे यांनी व्यक्त केला.

एरंडोल तालुका पत्रकार संघातर्फे विकास नवळे यांचे स्वागत व सत्कार करण्यात येऊन शहराच्या विकासासंदर्भात पत्रकारांशी हितगूज केले त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगरपालिका कार्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक हितेश जोगी यांचेही स्वागत करण्यात आले. बुलंद पोलीस टाईम या वर्तमानपत्राचे जिल्हा क्राईम प्रतिनिधी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल पिंटू राजपूत यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक शहराध्यक्ष कैलास महाजन यांनी केले. सूत्रसंचालन कुंदन ठाकूर यांनी केले. प्राध्यापक नितीन पाटील, शैलेश चौधरी, गणेश महाजन, नितीन ठक्कर, राजधर महाजन, उमेश महाजन यांची समयोचित भाषणे झाली. शेवटी पत्रकार संघाचे सचिव पंकज महाजन यांनी आभार मानले.